|| श्री सद्गुरू राघवदास महाराज ||
महाराष्ट्रात अनेक सत्यपुरुष होऊन गेले.
त्यांच्यापैकी अनेकांची चरितही प्रसिद्ध झाली. परंतु जनतेपासून अगदी अलिप्त व प्रसिद्धपराङमुख
असेही काही सत्पुरुष
झाले. संतश्रेष्ठ राघवदास ब्रह्मचारी त्यांच्यापैकीच एक होते. त्यांचा शिष्यवर्ग
महाराष्टातील सर्व
जिल्हयांत आहे. विदर्भ, नागपूर वैगेरे ठिकाणीही त्यांचे भक्त आहेत. परराष्ट्रातील भक्तही त्यांच्या दर्शनास येत. मुक्तानंदमहाराज सुध्या यांच्या दर्शनास येऊन गेले.
श्री क्षेत्र आळंदी येथे साठ वर्ष एकांतात राहून श्री समर्थ रामदासस्वामी प्रमाणे गायत्रीपुरश्चरण करून, श्री ज्ञानेश्वरमाऊलीची अखंड सेवे करून महाराजांनी ईश्वर प्राप्ती करून घेतली. अशा सत्यपुरुषच्या चारित्र्य वैगेरे नाही . तथापि त्यांचे परम भक्त प्रा. र. श्री. पुजारी यांना स्नानानंतर म्हणण्याकरिता हि ' स्तवनमंजिरी '
रचिली. जणू एकशे आठ ओव्या करून त्यांनी हि जपमाळाच भक्तांपुढे ठेवली. या स्त्रोत्र मुळे भवसागरातून सुटका होऊन मनःशांती व समाधान लाभेल. जन्माचे सार्थक होई. हे मी स्वानुभावाने सांगत आहे. म्हणून मानसिक समाधानासाठी प्रत्येकाने
या ' स्तवनमंजिरी ' चा नित्यपाठ जरूर करावा असे नम्र सांगितले आहे.
श्रीसद्गुरू राघवदास महाराज यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम