ikon Smart Varkari

Smart Varkari

1.0 for Android
3.0 | 10,000+ Instal

MARSAM Software Pvt Ltd

Penjabaran dari 9apps Smart Varkari

Uses- या अँपद्वारे आपणास सर्व वारकरी संतांची चरित्रे आणि वाङ्मय ऑनलाईन पद्धतीने अभ्यासायला मिळणार आहेत. शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन, पैठण द्वारे सर्वप्रथम हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. एकाच छत्राखाली संतांच्या निवडक साहित्याचा अभ्यास व त्याची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणारा महाराष्ट्रातील हा एकमेव ऑनलाईन उपक्रम आहे. इ स २०१६ साली सुरु झलेल्या या अभ्यासक्रमाने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळविली.
हजारो लोकांपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा अभ्यासक्रम पोचला आहे; एवढेच नाही तर देशाच्या बाहेरीलही अनेक विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. संतवाङ्मयाचा सकारात्मक परिणाम होऊन अनेकांनी वारकरी संप्रदायाचा अंगिकारही केला आहे.
निकष- संतवाङ्मयावर नितांत श्रद्धा असणे हा एकमेव निकष ही परीक्षा देण्यासाठी लावण्यात आलेला आहे. कोणत्याही वयाचे,लिंगाचे,प्रदेशाचे,पंथाचे,जातीचे व धर्माचे बंधन यात नाही कारण संतांचे वाङ्मय हे संपूर्ण जगाच्या कल्याणार्थ उत्पन्न झालेले आहे.
अभ्यासक्रमाविषयी - हा अभ्यासक्रम एकूण तीन वर्षांचा असून प्रतिवर्षी तीन याप्रमाणे एकूण नऊ चाचण्या / सेमिस्टर घेण्यात येतात. परीक्षा व तत्सबंधीची माहिती ही अँप नेटिफिकेशन आणि आमच्या फेसबुक पेज
च्या माध्यमातून जाहीर करण्यात येते. प्रत्येक सेमीस्टरचा अभ्यासक्रम हा ठरलेला असून तो याच अँपद्वारे आपल्याला पीडीएफ च्या स्वरूपात डाउनलोड करता येण्यासारखा आहे. तो डाउनलोड करून त्या त्या परीक्षेच्या वेळी तो तो अभ्यास करावयाचा आहे. यावरच प्रश्न विचारण्यात येतील. एका प्रश्नांची चार उत्तरे समोर असून त्यातील योग्य पर्यायाची निवड करायची आहे. सर्व प्रश्न साधारणतः याच स्वरूपाचे असतील. ३०-३०-४० मार्क्स अशा पद्धतीने तीन सेमिस्टरच्या मार्क्सची रचना असेल. प्रतिवर्षी उत्तीर्ण होण्यासाठीं किमान ३५% गुणांची आवश्यकता असून उत्तीर्ण होणाऱ्यास प्रतिवर्षी प्रमाणपत्र देण्यात येते. याची रजिस्ट्रेशन व प्रथमवर्ष परीक्षा फी म्हणून रुपये २०० अँपमधील सुरक्षित अशा नेटबँकिंगच्या माध्यमातून अथवा मिशनच्या बँक खात्यात जमा करावयाची आहे. ( बैंकेत पैसे जमा केले असल्यास त्याच्या पावतीचा फोटो अँपवर अपलोड करावा ). हा अभ्यासक्रम स्वतःच्या आनंदासाठी व संतविचारांची व्यापकता लक्षात येण्यासाठी असून वारकरी संप्रदायातील अनेक महानुभावांचे मार्गदर्शन यासाठी लाभत आहे. सकळ संतांना पूज्यबुद्धीने पाहणाऱ्या पिढ्या घडविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे तसेच अन्यत्र कोठेही संतांचे वाङ्मय एकत्रितरित्या अभ्यासायची उपलब्धता नसल्याने याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराजांचे १४ वे वंशज व मिशन प्रमुख ह भ प श्री योगिराजमहाराज गोसावी पैठणकर यांनी केले आहे.
आणखी काय - या अँपमध्ये आपण संत एकनाथ महाराजांविषयी सर्व माहिती, मिशनची कार्ये, पैठणच्या श्रीएकनाथषष्ठी व इतर महत्वाच्या उत्सवांविषयी वेळोवेळी टाकण्यात येणारी छायाचित्रे व माहिती पाहू शकाल.
इ- मासिक वारकरी संदेश- दर चार महिन्याला प्रकाशित होणारे "इ- मासिक वारकरी संदेश" आपण मोफत वाचू शकणार आहात तसेच ते मोफत डाऊनलोडही करू शकणार आहात. यात महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व संतसाहित्याच्या अभ्यासकांचे लेख वाचू शकाल. संतसाहित्यावर लिखाण करणारे अभ्यासक निर्माण व्हावेत यासाठी ऑनलाईन परीक्षेच्या प्रथमवर्ष उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी यात साधारणतः ५०% जागा राखून ठेवली आहे. त्यातील निवडक लेख प्रकाशित करण्यात येतील. तसेच वारकरीसंप्रदायाच्या महत्वाच्या कार्यक्रमांविषयीची माहिती वेळोवेळी नोटिफिकेशनच्या द्वारे आपणास मिळत राहणार आहे. यामुळे हे अँप डाउनलोड करून वरील सर्व गोष्टींचा आपण अवश्य लाभ घ्यावा.

Memperbarui Smart Varkari 1.0

Some UI changes updated.

Informasi

  • Kategori:
    Sosial
  • Versi Terbaru:
    1.0
  • Perbarui:
    2018-12-02
  • Ukuran File:
    7.1MB
  • Persyaratan:
    Android 4.4 or later
  • Diupdate:
    MARSAM Software Pvt Ltd
  • ID:
    in.marsam.varkari